पुणे:- शहाजीराजांच्या संकल्पनेतून जिजाऊंच्या मार्गदर्शनाने शिवबांनी स्वराज्य निर्माण केले. जिजाऊंच्या उपस्थितीत ६ जून १६७४ रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला शिवराय छत्रपती झाले. असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव यांनी वाल्हेकरवाडी येथे जिजाऊ जयंती कार्यक्रमात केले. जिजाऊ जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड,संभाजी ब्रिगेड व त्रिवेणी हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रमुख मान्यवर महिलांनी जयंतीनिमित्ताने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.

रत्नप्रभा सातपुते यांनी जिजाऊ वंदना सादर केली. या कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव,संपतराव जगताप, अनिल कारंजेकर,अशोक सातपुते मराठा सेवा संघाच्या आरोग्य कक्षाचे प्रमुख व त्रिवेणी हॉस्पिटलचे संचालक डाॅ.मोहन पवार,बालरोगतज्ज्ञ डाॅ.शैलेश मोरे,संभाजी ब्रिगेडचे प्रविण कदम,वैभव जाधव,राजेश सातपुते,किरण खोत जिजाऊ ब्रिगेडच्या सुलभा यादव, सुनिता शिंदे, माणिक शिंदे, अश्विनी पाटील, शालन घाटुळ, कौशल्या जाधव हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवाजीमहाराज यांचे सेनानी झुंझारराव मरळ देशमुख यांचे वंशज निलेश मरळ देशमुख, डाॅ.मोहन पवार, सुनिता शिंदे, प्रविण कदम यांनी जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विषयी मनोगते व्यक्त केली.आभार वैभव जाधव यांनी मानले. या आरोग्य शिबीराचा एकूण ७२ रुग्णांनी लाभ घेतला यासाठी त्रिवेणी हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांसह सर्व स्टाफने सहकार्य केले.


