Author: Editor Sanvidhan Kalam

पुणे:- गॅस सिलिंडरमधून छुप्या पद्धतीने गॅस काढून सर्वसामान्यांची लूट करणाऱ्या ‘देगलूरकर गॅस एजन्सी’चा काळाबाजार ‘रिपब्लिकन संघर्ष सेने’ने उघडकीस आणला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासन आणि पोलीस विभागाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने, रिपब्लिकन संघर्ष सेनेचे राष्ट्रीय सचिव आयु. श्रीकांत दारोळे यांनी संघटनेच्या वतीने उद्या, २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन) पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. नेमका प्रकार काय? आळंदी-मरकळ रोडवरील तनिश सोसायटी शेजारी ‘देगलूरकर गॅस एजन्सी’चे अनधिकृत कार्यालय कार्यरत आहे. या ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरमधून बेकायदेशीररीत्या गॅसची चोरी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. रिपब्लिकन संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या आदेशानुसार शिष्टमंडळाने ज्यामध्ये श्रीकांत दारोळे राष्ट्रीय सचिव, एकनाथ अडसूळ अध्यक्ष…

Read More

पुणे (प्रतिनिधी):- पुण्यातील कर्वेनगर भागात अत्यंत धोकादायक पद्धतीने सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग आणि साठवणुकीच्या काळ्या धंद्यावर रिपब्लिकन संघर्ष सेनेने धडक कारवाई केली आहे. ‘मंगलमूर्ती गॅस’ या ठिकाणी सुरू असलेल्या या जीवघेण्या प्रकाराचा संघटनेने पर्दाफाश केला असून, वारजे माळवाडी पोलिसांनी या प्रकरणी आरोपीसह मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. काय आहे नेमकी घटना? कर्वेनगर येथील ‘मंगलमूर्ती गॅस’ येथे घरगुती गॅस सिलेंडरमधून अवैधरित्या गॅसची चोरी (Refilling) केली जात असल्याची माहिती रिपब्लिकन संघर्ष सेनेला मिळाली होती. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आयु. शशिकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी तिथे अत्यंत असुरक्षित वातावरणात गॅस ट्रान्सफर करण्याचे काम सुरू असल्याचे समोर आले. मोठा…

Read More

पुणे:- शहाजीराजांच्या संकल्पनेतून जिजाऊंच्या मार्गदर्शनाने शिवबांनी स्वराज्य निर्माण केले. जिजाऊंच्या उपस्थितीत ६ जून १६७४ रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला शिवराय छत्रपती झाले. असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव यांनी वाल्हेकरवाडी येथे जिजाऊ जयंती कार्यक्रमात केले. जिजाऊ जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड,संभाजी ब्रिगेड व त्रिवेणी हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रमुख मान्यवर महिलांनी जयंतीनिमित्ताने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. रत्नप्रभा सातपुते यांनी जिजाऊ वंदना सादर केली. या कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे प्रकाश जाधव,संपतराव जगताप, अनिल कारंजेकर,अशोक सातपुते मराठा सेवा संघाच्या आरोग्य…

Read More

पिंपरी चिंचवड:- मराठा सेवा संघाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मातृ तीर्थ सिंदखेडराजा जिल्हा बुलढाणा येथे जिजाऊंचे जन्मस्थान राजे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा आणि जिजाऊ सृष्टी येथे ११ व १२ जानेवारी रोजी लाखों जिजाऊ प्रेमींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव सोहळा संपन्न होणार आहे. ११ जानेवारी रोजी सायंकाळी राजवाड्यात दीपोत्सव तसेच जिजाऊ सृष्टी ते राजवाडा अशी जिजाऊ ब्रिगेडच्या ४२८ महिला मशाल यात्रा काढणार आहेत.यानंतर जिजाऊ सृष्टी येथे देशभरातून विविध राज्यातून आलेल्या महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.१२ जानेवारीला सूर्योदयापूर्वी दहा जोडप्यांच्या हस्ते राजवाड्यात महापूजा होणार आहे. सकाळी सात वाजता राजवाडा ते जिजाऊ सृष्टी अशी भव्य वारकरी दिंडी…

Read More

पुणे:- संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे यांना सामाजिक, वैचारिक व बहुजनहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ‘क्रांतिरत्न पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. देहूरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमात हा सन्मान करण्यात आला. बुद्धविहार कृती समिती व धम्मभूमी फेस्टिव्हल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्याचे संयोजक टेक्सास गायकवाड होते. अष्टप्रधान मंडळ, बुद्धविहार कृती समिती, धम्मभूमी सुरक्षा समिती, धम्मभूमी एज्युकेशन सोसायटी, धम्मभूमी महिला महासंघ व ज्येष्ठ उपासक संघ यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला. पुरस्कार प्रदान करताना आयोजकांनी नमूद केले की, “क्रांतिकारी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून सतिश काळे यांनी निधड्या छातीने ब्राह्मणी व्यवस्थेविरुद्ध लढा देत बहुजन समाजाला…

Read More

नवी दिल्ली :— महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय पटलावर वंचित व दुर्बळ घटकांसाठी सातत्याने कार्यरत असणारे जनसेवक मा. मंगेश सोनवणे यांच्या कार्याचा राष्ट्रीय पातळीवर गौरव झाला आहे. मानवाधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटन आणि श्रमिक ब्रिगेड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार” त्यांना १० डिसेंबर २०२५ रोजी प्रदान करण्यात आला. संघटनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नवी दिल्ली येथील ऐतिहासिक महाराष्ट्र सदन येथे एका दिमाखदार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, भारत सरकार मा. रामदासजी आठवले साहेब यांच्या शुभहस्ते हा गौरवशाली पुरस्कार मा. सोनवणे यांना प्रदान करण्यात…

Read More

नागपूर:- बिबट्या-मानव संघर्ष (Leopard-Human Conflict) कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत, वन विभागाने जुन्नर येथील बिबट्या रेस्क्यू सेंटरची (Leopard Rescue Center) क्षमता वाढवण्याचा आणि अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर) जिल्ह्यामध्ये दुसरे नवीन केंद्र उभारण्याची घोषणा केली आहे. विधानसभेमध्ये (Maharashtra Assembly) जुन्नर तालुक्यातील बिबट्या रेस्क्यू सेंटरच्या अनुषंगाने उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी ही माहिती दिली. स्थानिक आमदार शरद सोनावणे यांनी बिबट्यांच्या वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेल्या मानवी वस्तीतील धोक्यावर आणि रेस्क्यू सेंटरच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केला होता. 🪶 वनमंत्र्यांनी विधानसभेत दिलेली महत्त्वपूर्ण माहिती: वनमंत्री गणेश नाईक यांनी सभागृहात सांगितले की, जुन्नर परिसरात बिबट्यांची वाढती संख्या आणि त्यामुळे वारंवार होणारा…

Read More